Sharad Pawar and Jayant Patil

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

451 0

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून मंचरमध्ये शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमातून शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला, तर जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा सूचक विधान केलं आहे, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?
‘अमोल कोल्हे यांनी अनेक कामं मार्गी लावली, संसदेत आवाजही उठवला. मावळच्या खासदाराने किती वेळा तोंड उघडलं? देशात इतर कोणत्याही खासदाराने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले नाहीत. डॉ. अमोल कोल्हेसारखा हिरा तुम्हाला मिळालाय, तो जपा. शरद पवार साहेब हाच आपला पक्ष, त्यांना जे चिन्ह मिळेल ते घराघरात पोहोचवायचं आहे. शरद पवार या नावाला दिल्लीही दचकते. शरद पवार अनेक डाव टाकतात, एक शेवटचा डाव तुम्हा सर्वांना चकीत करणारा असेल,’ असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

दोनच दिवसांपूर्वी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण जयंत पाटील यांनी या बातम्या फेटाळून लावत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र जयंत पाटील यांच्या ह्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News
error: Content is protected !!