Akola News

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

312 0

अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (Akola News ) सुरुवात झाली. या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या. मात्र तरीदेखील काही कॉपी बहाद्दरांनी नवीन आयडिया शोधून कॉपी केल्याचे समोर आले आहे. असाच एक कॉपीचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल या १२ वीच्या परीक्षा केंद्रावर घडला.

काय घडले नेमके?
बहिणीसाठी भाऊ कायपण करायला तयार असतो. याचाच प्रत्यय तुम्हाला या प्रकरणातून येईल. यात चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे बिंग फुटले आणि आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (24, रा. पांगरा बंदी) असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.

असा उघडकीस आला बनाव?
पातुरच्या शाहाबाबु हायस्कुलच्या परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थींचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलीसाचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस बनला. त्यानंतर बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले असता, तोतया पोलिसाची एकच तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता तोतया अनुपमनं त्यांना सॅल्यूट ठोकला. परंतु पोलिसांनी त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.

आरोपी भावाविरोधात गुन्हा दाखल
पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तोतया पोलीस असलेल्या अनुपमची अधिक विचारपुस केली असता, हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या जवळ इंग्रजी विषयाची कॉपी आढळून आली. यानंतर पातूर पोलिसांनी अनुपम विरोधात 417, 419, 170, 171 आणि अधिनियम 1982 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

Pune Crime

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

Posted by - February 27, 2024 0
पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune Crime News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये तरुण पिढीदेखील गुन्हेगारीमध्ये अडकत चालली…
Satara News

Satara News : पुणे -बंगळूरु महामार्गावर आयशर ट्रकचा भीषण अपघात; 3 जण ठार

Posted by - September 14, 2023 0
सातारा : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पुणे – बंगळूरु आशियाई महामार्गावर (Satara News) खंडाळा तालुक्यात शिरवळ…
Jalna Crime

Jalna Crime : पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा कारमध्ये होरपळून मृत्यू; जालनामधील घटना

Posted by - June 23, 2023 0
जालना : जालनामध्ये (Jalna Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कारच्या एका भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.…
Telgi Scam

Telgi Scam : छगन भुजबळांनी उल्लेख केलेला अब्दुल करीम तेलगी कोण आहे? आणि काय होता स्टॅम्प पेपर घोटाळा?

Posted by - August 28, 2023 0
मुंबई : रविवारी बीडमध्ये अजित पवार गटाची सभा पार पडली. या सभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *