Sharad Pawar And Devendra Fadanvis

Sharad Pawar : फडणवीसांची माफी म्हणजे…; लाठीचार्जवर पवारांचं मोठं वक्तव्य

615 0

जळगाव : आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जळगावमध्ये आगमन होताच त्यांचं (Sharad Pawar) भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

नेमके काय म्हणाले शरद पवार?
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला. लाठीचार्जनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. यानंतर सोमवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत माफी मागीतली. यावरून शरद पवार यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीसांची माफी म्हणजे एक प्रकारची कबुलीच असल्याचं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!