ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण (व्हिडिओ)

मुंबई- मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असून नेते-अभिनेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिक देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घ्यावी, असं शरद पवार यांनी आवाहन केलं आहे. गेल्या काही दिवसामंध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं दिसून आलं होतं. आता शरद पवार यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन माहिती काळजी करण्याचं कारण नसल्याचं सांगितलं आहे.