ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांचे राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून उज्वल निकम यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान उज्वल निकम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर पुनम प्रमोद महाजन यांचा पत्ता कट करत भारतीय जनता पक्षाकडून उज्वल निकम यांना उत्तर मुंबई लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून उज्वल निकम यांचा पराभव झाला.
त्यानंतर आता उज्वल निकम यांचे राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उज्वल निकम यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली
राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर कुणाकुणाची नियुक्ती?
उज्वल देवराम निकम
सी. सदानंदन मास्टर
हर्षवर्धन सिंघालिया
मीनाक्षी जैन