Govardhan Sharma

Govardhan Sharma : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

1738 0

अकोला : भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आणि अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा (Govardhan Sharma) यांचे काल रात्री निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर काल त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

गोवर्धन शर्मा यांनी सहावेळा अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. राज्यमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला विस्तार करण्यात मोठी मदत झाली. अकोला जिल्ह्यात त्यांना लोकनेते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम भक्त पक्षाविषयी असलेले एकनिष्ठ लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती.

तसेच पश्चिम विदर्भात भारतीय जनता पक्षाला वाढवणारे आणि लोकप्रतिनिधी घडवणारे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, भाऊसाहेब फुंडकर, प्रमिलाताई टोपले, वसंतराव देशमुख, संजय भाऊ धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. आज त्यांच्यावर अन्नपूर्णा माता मंदिराजवळ अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!