Sanjay Raut

संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ!

451 0

नाशिक : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून (Nashik Rural Police) त्यांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना श्रीकांत शिंदेंबाबत (Shrikant Shinde) प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीविरोधात शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. नाशिक (Nashik)ग्रामीण पोलिसांकडून संजय राऊत यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. संजय राऊत ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत त्या हॉटेलच्या बाहेर ही सुरक्षा (Security) पुरवण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!