महाविकास आघाडीचा महामोर्चा; संजय राऊत सुप्रिया सुळे मोर्चास्थळी दाखल

290 0

मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चात समविचारी पक्ष, महाराष्ट्र प्रेमी महापुरुषांना माणणारे सुद्धा सामील होणार आहेत. या महामोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे मोर्चा स्थळी दाखल झाले असून या महामोर्चाला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडीचा हा महामोर्चा भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते सीएसएमटी रेल्वे स्टेशनपर्यंत (टाईम्स ऑफ इंडिया) असणार आहे. या पार्श्वभूमीवर अडीच हजार पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!