Sanjay Raut And Ajit Pawar

धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला

537 0

नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका मुलाखतीदरम्यान प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्याचं नाव घेताच थुंकले. मीडियात हा क्षण कैद झाला. त्यांच्या या कृतीवरून राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वांनीच संयमाने वागलं पाहिजे, असा टोला संजय राऊत यांना लगावला. यानंतर संजय राऊत यांनी अजित पवारांचा सल्ला पचनी न पडल्याने जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?
धरणामध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं. संयम तर राखला पाहिजे सर्वांनी बरोबर आहे. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत, अशा खोचक शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. आम्ही भोगूनही जमिनीवर आहोत. इकडे तिकडे पळालो नाही. माझ्या पक्षाबरोबर आम्ही ठामपणे उभे आहोत. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा, आमच्यावर संकट येतात म्हणून भाजपसोबत (BJP) सूत जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही, असा टोलादेखील संजय राऊत यांनी यावेळी अजित पवारांना लगावला.

Share This News
error: Content is protected !!