Sanjay Raut And Ajitdada pawar

Sanjay Raut : अजित पवारांच्या बंडावर ठाकरे गटाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

503 0

पुणे : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी शपथ घेतली आहे. या सगळ्या घडामोडीवर आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

काय म्हणाले संजय राऊत?
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन राजभवनात शपथविधीसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांचा फोटो पोस्ट केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले” मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.”. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.” असं ट्विट करून संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Share This News
error: Content is protected !!