सांगलीचे खासदार संजय पाटील भाजपाला सोडचिठ्ठी देणार ?

574 0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सांगली जिह्ल्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तेथील राजकारणातही खळबळ नेहमीप्रमाणे उडाली. खासदार संजय पाटील यांनी येथील  आपली भूमिका स्पष्ट केली. 

सांगली जिल्ह्याला गडकरी यांच्या माध्यमातून रस्त्यांसाठी व ताकारी, टेंभू, म्हैसाळ तसेच रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण या कामासाठी मोठा निधी मिळवून दिल्याबद्दल गडकरी यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. डाळिंब आणि बेदाण्याचा हार घालून हा सत्कार करण्यात आला. सांगलीच्या भिवघाट येथे खासदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या निमित्ताने खासदार पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी नाराज असल्याच्या अफवा नेहमी परसविल्या जातात. मात्री भाजप सोडून जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांच्याविषयीचा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!