Maharashtra Politics

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

522 0

पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात (Maharashtra Politics) आली आहे. लोकसभेच्या सहा टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. तर सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी पार पडणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच राजकीय पक्षांना आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसंदर्भात संभाजी ब्रिगेडकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आपण आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागा लढवणार असल्याचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी म्हटलं आहे.

नेमके काय म्हणाले मनोज आखरे?
‘नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आता आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागा लढवण्याची तयारी केली आहे. प्रामुख्याने मराठवाड्यातील हिंगोली आणि चिखली विधानसभा मतदारसंघासह इतर तेवीस जागा आपण लढवणार आहोत.’ असं आखरे यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पार पडलेल्या राज्यव्यापी कार्यकारणीच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide