मुंबई : मान्सून भारतात दाखल झाला आहे. मान्सूनचं (Monsoon Update) केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी आगमन झालं आहे.10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात 10 जूनपासून मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, the 30th May, 2024.
— India Meteorological Department (@Indiametdept) May 30, 2024
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे आणि तो पुढे हळूहळू ईशान्य भारताच्या बहुतांश भागांत पुढे सरकेल, असं सांगितलं जात आहे. केरळमध्ये पोहोचल्यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप