Sambhaji Bhide

Sambhaji Bhide : ‘संभाजी भिडेंचे पाय तोडून आणा मी 2 लाख रुपये देईन; MIMच्या नेत्याची जीभ घसरली

947 0

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी (Sambhaji Bhide) काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत एक विधान करुन वाद ओढावून घेतला होता. त्यांच्या विधानानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

संभाजी भिडेंचे पाय तोडून आणणाऱ्याला 2 लाख देईन
यादरम्यान महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांचा आम्ही निषेध करतो. वारंवार महापुरुषांवर अपमान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भिडे हे नथुराम गोडसे याची औलाद असल्याचा आरोप करत जो कोणी भिडे यांची मिशी न कापता पाय तोडून आणेल त्यांना मी दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणा सोलापूर एमआयएमचे शहर युवक अध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकर यांनी केली आहे.

यादरम्यान एमआयएमच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. देशद्रोही भिडे यांना राज्य, केंद्र सरकार पाठिशी घालत आहे. त्यामुळे आम्ही भाजपचा निषेध करतो. भिडेंना तातडीने अटक करावी अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.

Share This News
error: Content is protected !!