Rohini-Khadse

Rohini Khadse : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची नियुक्ती

745 0

पुणे : राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची (Rohini Khadse) नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते खडसे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं.

कोण आहेत रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे (Rohini Khadse ) या महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री व मुक्ताईनगरचे माजी आमदार एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. त्या शिक्षणाने एक वकील आहेत . त्यांना रोहिणी खडसे-खेवलकर या नावाने सुद्धा ओळखले जातात. त्या जळगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पतीचे नाव प्रांजल खेवलकर आहे. रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे.

रोहिणी खडसे यांनी 2019 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व त्या 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.मात्र, त्यांचा शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता. त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष होत्या. आणि सध्या संत मुक्ताई साखर कारखाना , घोडसगाव या कारखान्याची संचालक आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!