आपला महाराष्ट्रठळक बातम्याराजकारण

Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा नेमका कोणावर निशाणा?

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत, विविध मुद्द्यावर भाष्य केले. यादरम्यान त्यांनी राज्यात सातत्याने घडून येणाऱ्या धार्मिक दंगलीबाबत (Religious Riots) आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
“राज्यात सातत्याने दंगली घडून येत आहेत. धार्मिक दंगली मर्यादित भागात झाली असेल तर फार चिंतेचा विषय नाही. मात्र असे प्रकार घडत नसून, ते जाणीवपूर्वक घडवले जातात असे शरद पवार म्हणाले. अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कोणीतर गर्दीत कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवतो आहे. आता या गोष्टीसाठी इतर ठिकणी दंगल करायचं कारण काय? यासाठी पुण्यात आंदोलन करायची काय गरज आहे, असा सवालदेखील शरद पवार यांनी विचारला आहे. यावरून शरद पवारांनी नेमका कोणावर निशाणा साधला याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.