Chandrashekhar Bawankule

कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला; बावनकुळेंनी केले स्पष्ट

631 0

नागपूर : कल्याण लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये धूसफूस सुरू आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची जागा भाजपा लढवणार कि ठाकरे गट लढवणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या प्रकरणावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?
कुठल्याही जागेचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डला आहे, त्यामुळे उत्साहाच्या भरात कोणी काही बोललं असेल, त्यांच्याकडचे किंवा आमच्याकडचे कोणी काही बोलले असतील तर त्याला महत्त्व नाहीये, पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल तशाच जागा वाटप होतील. जागा वाटपाचा अधिकार हा राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले भारतीय जनता पक्षाचा मी 32 वर्षांपासून कार्यकर्ता आहे, कोणाच्या अधिकारात हस्तक्षेप करेल असं मला वाटत नाही. शिवसेनेत कोणाला मंत्री करायचं कोणाला नाही, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा असल्याचे ते म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!