Rajesh Tope

Rajesh Tope : राजेश टोपेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक

501 0

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत. माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञात मराठा आंदोलकांकडून टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केली आहे.

जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडलेली आहे. या दगडफेकीची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून सध्या दगडफेक करण्याऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; ‘हे’ कारण आले समोर

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला ऑरेंज अलर्ट

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

IPL Auction Registration : आयपीएल लिलावासाठी ‘एवढ्या’ खेळाडूंनी केली नोंदणी

Reservation : ओबीसी नेते डॉ. तायवाडे यांच्या विरुद्ध ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!