MNS Raj Thakre

2 हजारांच्या नोटबंदीवर राज ठाकरेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले….

605 0

नाशिक : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांवर आपले मत मांडले आहे. काल रात्री अचानक रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे. जर तज्ज्ञांशी बोलून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने अचानक दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. यावरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाण साधला. हा धडसोडीचा प्रकार आहे. अशानं सरकार चालणार आहे का? मी त्याचवेळी बोललो होतो, जर तज्ज्ञांना विचारून दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली असती तर आज ती बंद करण्याची वेळ आली नसती असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!