आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

Raj Thackeray : अजित पवारांच्या बंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली आहे.या सगळ्या घडामोडीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut : अजित पवारांच्या बंडावर ठाकरे गटाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

काय म्हणाले राज ठाकरे?
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल.

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?