मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी जाहीर केला. आज आपण निकाल जाहीर केलेल्या नार्वेकरांचा प्रवास जाणून घेऊया…
कसा आहे नार्वेकरांचा प्रवास?
महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विजयी झाले. राहुल नार्वेकर यांना 164 तर महाविकासआघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना 107 मतं मिळाली. 11 फेब्रुवारी 1977 रोजी जन्मलेले नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष आहेत. त्यांना वयाच्या 45 व्या वर्षीच अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नार्वेकर हे कायद्याचे पदवीधर (LLB) असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांचा त्यांचा जवळचा संबंध आहे. या संस्थेचे कायदेशीर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवड झालेल्या नार्वेकरांचा भाजप हा तिसरा पक्ष आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात शिवसेनेतून झाली. शिवसेनेमध्ये ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे समजले जायचे. शिवसेनेतील आधुनिक आणि इंग्रजी बोलणारा, मीडियाचा जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख होती. त्यानंतर नार्वेकरांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी विधान परिषदेचे आमदार असलेले नार्वेकर 2019 मध्ये पहिल्यांदाच कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार
Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी
Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव