Shivsena

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता

688 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना पक्षात 2022 मध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट व ठाकरे गट या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात अध्यक्षांकडे अपात्रता नोटीस सादर केली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर न्यायालयानेही आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं नमूद करत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर यासंदर्भात राहुल नार्वेकरांसमोर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. ज्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मुळ शिवसेना असल्याचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला.

Share This News
error: Content is protected !!