ठळक बातम्याराजकारण

PUJA CHAVHAN CASE : “संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं अत्यंत दुर्दैवी”..! ; चित्रा वाघ यांचे ट्विट चर्चेत

PUJA CHAVHAN CASE : आज मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला असून संजय राठोड यांना दिल्या गेलेल्या मंत्रीपदावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांनी एक ट्विट करून “पूजा चव्हाण च्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्ध चा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लढेंगे जितेंगे असं ट्विट त्यांनी केला आहे.”