काळी टोपी आणि प्रिंटेड शर्ट; कर्नाटक दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास लुक चर्चेत

604 0

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नरेंद्र मोदी आज बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये भेट देणारा असून या भेटीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवीन लुक सोशल मीडियावर व्हयरल होतोय काळी टोपी, खाकी पँट, प्रिंटेड टी शर्ट, काळे शूज आणि स्लीव्हलेस जॅकेटसह मोदी दिसत आहेत. मोदींचा हा लुक व्हायरल झाला आहे.

म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाणार आहेत. पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधणार आहेत. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही पंतप्रधान भेट देणार आहेत.

 

 

Share This News
error: Content is protected !!