अयोध्या: राज्यातील अभूतपूर्व सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर जात असून रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.
दरम्यान या अयोध्या दौऱ्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे.
आजचा अयोध्या दौरा म्हणजे केवळ दिखावा असून गद्दारांची टोळी अयोध्येला जात आहे असं अंबादास दानवे म्हणाले, पुढं बोलताना दानवे म्हणाले की, “जो धनुष्यबाण त्यांना भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कृपेने मिळालेला आहे. जो धनुष्यबाण त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या देवाऱ्यातून चोरला आहे. तो धनुष्यबाण यांच्या हाती कधीच शोभणार नाही. हा धनुष्यबाण कधी रामाचा होऊ शकत नाही, श्री कृष्णाचा होऊ शकत नाही. हा धनुष्यबाण रावणाचाच आहे. हा जनतेचा कल्याण कधीच करु शकत नाही. तर ज्यावेळी राम मंदिर नव्हतं, बाबरीचा ढाचा होता आणि त्यावेळी शिवसेनेने लढा लढला.