Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा लढवणार? भाजपकडून चाचपणी सुरु

494 0

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजपच्या उच्चपदस्थ नेत्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून चाचपणीदेखील करण्यात आली आहे. जर पीएम मोदी पुण्यातून लढले तर पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर त्याचा प्रभाव जाणवेल, अशी रणनिती भाजपने आखली आहे.

https://youtu.be/MfLJUzcY_bQ

पीएम मोदी (Narendra Modi) यांनी याआधी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक भाजपसाठी तेवढी सोपी नसल्याचे काही सर्व्हेतून समोर आले आहे.

या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला केवळ 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या ‘इंडिया’ आघाडीला 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यामुळे आता नरेंद्र मोदी खरंच पुण्यातून निवडणूक लढवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!