Bhaskar Jadhav

भास्कर जाधवांची डोकेदुखी वाढणार? मनसेकडून गुहागरमध्ये विधानसभेसाठी मोर्चेबांधणी

539 0

रत्नागिरी : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्यासह देशातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मनसे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे समोर आले आहे. त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवातदेखील केली आहे. तसेच लोकसभेसोबत मनसे सैनिक विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचंही पाहायला मिळत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात मनसे सैनिकांनी तयारी सुरू केली आहे. गुहागरमधून मनसे नेते प्रमोद गांधी यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे.

गुहागरमधून विधानसभेसाठी प्रमोद गांधी यांना तिकीट मिळावं अशी मनसे सैनिकांची इच्छा आहे. त्यासाठी आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. प्रमोद गांधी यांना तिकीट देण्यात यावं अशी आग्रही मागणी मनसे सैनिकांकडून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता मनसेच्या गुहागरमधील एण्ट्रीमुळे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची डोकदुखी वाढण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!