Pratap Sarnaik letter मुंबईतील वरळी डोम सभागृहात नुकताच राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकत्रित मराठी विजय मेळावा संपन्न झाला.
दोन सन्माननीय…क्षण अविस्मरणीय! ठाकरे बंधूंचा 20 वर्षांनी मिलाफ! आवाज मराठीचा
या मेळाव्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया मदत असतानाच आता
शिवसेना नेते, ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप इंदिरा बाबुराव सरनाईक (Pratap Sarnaik)
यांनी ठाकरे बंधूंवर टीका करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
ते म्हणाले, मराठीच्या नावाखाली एकत्र येत आहेत,(Pratap Sarnaik letter) मग यापूर्वी वेगळे होणे कोणाच्या हितासाठी होते? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत.
त्यांचा जीव महापालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या राजकारणाला खोटारडे, स्वार्थी आणि विश्वासघातकी ठरवत,
त्यांनी मुंबई आणि मराठी माणसाची फसवणूक केल्याचा आरोप केला.
आपल्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरु आहे आणि आपण मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या ,
आपल्या संकल्पनेतून सुरू झालेल्या अनेक कल्याणकारी योजना यशस्वीपणे राज्यात सुरू आहेत. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत उंचीवर जात आहे.
पण आपल्या राज्यात , गेले काही दिवस मराठी भाषेचे निमित्त करुन स्वार्थी राजकारण पुन्हा एकदा सुरू झाले आहे ,
त्यामुळे या पत्रातून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या, असं प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेंना लिहिलेल्या पत्राद्वारे म्हणाले.
RAVINDRA DHANGEKAR JOIN SHIVSENA| काय म्हणता पुणेकर; शिवसेनेत गेले रवींद्र धंगेकर