Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर साधला निशाणा

910 0

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटद्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी 2014 मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना ट्विट मध्ये पुढे ते म्हणाले आहेत की, ‘द्वेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय फूट वाढवण्यावर विश्वास ठेवतात.’

भाजप – आरएसएस सतत सत्तेत राहावी यासाठी #दलित, #आदिवासी, #ओबीसी आणि #मुस्लिम यांना सतत दडपण, भीती आणि दहशतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.

Share This News
error: Content is protected !!