Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

354 0

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडील 203 कोटी 69 लाख रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आली आहे. स्व. लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचा प्राण हा कारखाना आहे, अशी मुंडे समर्थकांची धारणा आहे. लोकनेते गोपिंनाथ मुंडे यांची समाधी आणि स्मारक याच कारखान्याच्या जागेत आहे. येत्या 25 जानेवारीला या कारखान्याचा लिलाव पार पडणार आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर येथील न्यू उस्मानपुरा शाखेचे 20 एप्रिल 2021 पासून थकीत असलेल्या 203 कोटी 69 लाख रुपयांची कर्ज थकबाकी, व्याज व इतर कर्जांच्या वसुलीसाठी बँकेच्या अहमदनगर येथील कार्यालयाने ही प्रक्रिया हाती घेतली आहे. येत्या 25 जानेवारीला सकाळी 11 ते 5 या वेळेत ऑनलाईन पद्धतीने युनियन बँकेकडून हा लिलाव होणार आहे.

लिलावाच्या नोटिशीमध्ये अश्रुबा काळे, भाऊसाहेब घोडके, भीमराव तांबडे, दत्तात्रय देशमुख, दीक्षितुलू गुल्लापल्ली फनी, श्रीनिवास कृष्णा, ज्ञानोबा मुंडे, फुलचंद कराड, गणपतराव बनसोडे, जमनाबाई लाहोटी, केशव माळी, किसनराव शिंगारे, महादेवराव मुंडे, नामदेव आघाव, पांडुरंगराव फड, पंकजा मुंडे, परमेश्वर फड, प्रतापराव आपटे, आर. टी. देशमुख, शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे, विवेक मोरे-पाटील, वेंकटराव कराड, यशश्री मुंडे यांचा कर्जदार,जामीनदार व तारणदार म्हणून उल्लेख आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!