बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या जागेवर पंकजा मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे एकमेकांसमोर कसे निवडणूक लढवतील? अशी चर्चा सुरु होती. तिकीट जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
पंकजा मुंडेंनी दिला हा सूचक इशारा
पंकजा मुंडे यांनी आज खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीत साथ दिली तर विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंना साथ द्याल का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी धनंजय मुंडे यांना सूचक इशारा दिला. “जसं ते माझं लोकसभा निवडणुकीत काम करतील, तसंच मी त्यांचं काम करेन”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आशा
“धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष यांची राज्यात युती आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या आम्ही जिल्ह्यात एक आहोत. आमच्या युतीनंतर जेवढ्या मतांनी प्रीतम ताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान नक्कीच मिळेल”, अशी आशा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Nagpur News : तिहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं ! एकाच घरात आढळले 3 संशयास्पद मृतदेह
Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी
Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती
OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल
Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश
Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त
Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल