Ram Gopal Varma

Ram Gopal Varma : दिग्दर्शक राम गोपाल वर्मांची होणार राजकारणात एंट्री, ‘या’ मतदारसंघातून लढणार निवडणूक

1103 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधुम पाहायला (Ram Gopal Varma) मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह अनेक स्थानिक पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादी जाहीर होताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान आता लोकसभा निवडणुकांपूर्वी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते राजकारणात एंट्री करणार आहेत. विशेष म्हणजे ते यंदाची लोकसभा निवडणूकही लढणार आहेत.

काय म्हणाले राम गोपाल वर्मां ?
राम गोपाल वर्मा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी अधिकृत ट्विटरवरुन ट्वीट करत एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. “अचानक घेतलेला निर्णय… मला तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की मी पिठापुरममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे. या ट्वीटद्वारे राम गोपाल वर्मा यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. ते आंध्रप्रदेशच्या पिठापुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

राम गोपाल वर्मा यांच्याविषयी
राम गोपाल वर्मा यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म 7 एप्रिल 1962 रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी झाला. त्यांनी विजयवाडामधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बीइ ही पदवी मिळवली आहे. राम गोपाल वर्मा हे कॉलेजमध्ये असताना त्यांना चित्रपट, सिनेसृष्टी याबद्दल प्रचंड आकर्षण वाटायचे. कॉलेज संपल्यावर त्यांनी हैदराबादमध्ये व्हिडीओ रेंटल लायब्ररी सुरु केली. यानंतर हळूहळू तेलुगू सिनेसृष्टीमधील लोकांशी त्यांची ओळख वाढत गेली. 1989 मध्ये राम गोपाल वर्मा यांचा ‘सिवा’ हा पहिला तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट हिंदीतही बनवला. राम गोपाल वर्मा यांनी प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये काम केले आहे. ते लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. राम गोपाल वर्मा यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nagpur News : तिहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं ! एकाच घरात आढळले 3 संशयास्पद मृतदेह

Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी

Pune News : निलेश लंकेंच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या आतिषबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस भवन परिसरातील दुचाकीला आग

Kolhapur News : दारूची नशा डोक्यात गेल्याने पोलिसाचा ‘गुंड’ झाला; कोल्हापूरच्या हॉटेलमधील धक्कादायक Video आला समोर

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

OTT : मोदी सरकारने OTT संदर्भात उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Nilesh Lanke : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील पक्षप्रवेशाबाबत निलेश लंके यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Pune News : पुण्यातील ‘या’ कंपनीवर ईडीची कारवाई; ‘एवढ्या’ कोटींची मालमत्ता केली जप्त

Nashik News : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत मोठा गोंधळ; ‘या’ मोठ्या नेत्याला करण्यात आली धक्काबुक्की

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

RBI : RBI कडून ‘या’ 2 मोठ्या बँकांवर दंडात्मक कारवाई

Pawanmuktasana : पवनमुक्तासन करण्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Kajol

Kajol : 31 वर्षाच्या करिअरमध्ये काजोलने पहिल्यांदाच मोडली ‘ती’ पॉलिसी; म्हणाली ‘लोक काय म्हणतील….

Posted by - July 16, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.…
Richard Roundtree

Richard Roundtree : ‘ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो’ अशी ओळख असलेले रिचर्ड राउंडट्री यांचे निधन

Posted by - October 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘ब्लॅक अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून जगभरात लोकप्रिय असणारे अभिनेते रिचर्ड राउंडट्री (Richard Roundtree) यांचे निधन झाले…
Bollywood Movie

चित्रपट हे नेहमी शुक्रवारीच का होतात प्रदर्शित ?

Posted by - June 15, 2023 0
चित्रपट म्हणजे काही लोकांचा जीव कि प्राण. त्यातल्या त्यात आपल्या आवडत्या अभितेत्याचा असेल तर त्याची काही मज्जाच वेगळी. काही लोक…
Gautami Patil Vs Madhuri Pawar

Gautami Patil Vs Madhuri Pawar : महाराष्ट्र गाजवणाऱ्या गौतमी पाटील आणि माधुरी पवार या नृत्यांगना आल्या समोरासमोर; कोण कोणावर पडलं भारी?

Posted by - August 9, 2023 0
महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या दोन व्यक्ती म्हणजे नृत्यांगना माधुरी पवार आणि गौतमी पाटील (Gautami Patil Vs Madhuri Pawar). या दोघींनीही नृत्य…
Hemangi Kavi

Hemangi Kavi on Jhimma 2: ‘झिम्मा 2’पाहून हेमांगी कवीने दिग्दर्शकाला केली ‘ही’ विनंती; पोस्ट व्हायरल

Posted by - November 30, 2023 0
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ हा चित्रपट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद (Hemangi kavi on…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *