“शिवसेना संपण्याच्या मार्गावर ; देशात फक्त भाजप टिकेल…!” जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्याने नवीन वादंग

334 0

नवी दिल्ली : देशातून अनेक राजकीय पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शिवसेना संपण्याच्या मार्गावर असून, इतर प्रादेशिक पक्षही लयाला जातील आणि फक्त भाजप टिकेल, असा दावा करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या वादाला तोंड फोडले आह़े. शिवसेनेसह अन्य प्रादेशिक पक्षांनी नड्डा यांना लक्ष्य केल़े

भाजप हा भक्कम वैचारिक पाया असलेला पक्ष असून हीच भूमिका कायम ठेवून मार्गक्रमण केले तर आगामी काळात प्रादेशिक पक्षांचे अस्तित्वही संपुष्टात येईल. शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षांमध्ये घराणेशाही असून, या पक्षांशी भाजपला संघर्ष करावा लागेल, असेही नड्डा रविवारी बिहारमधील भाजपच्या कार्यक्रमात म्हणाल़े भाजप हा वैचारिक पाया असलेला पक्ष आहे.

वैचारिक पाठबळ नसते तर इतके मोठे राजकीय यश मिळाले नसत़े भाजपला आव्हान देईल, असा एकही राष्ट्रीय पक्ष टिकणार नाही. भाजपची लढाई वंशवाद आणि घराणेशाहीवाल्या पक्षांशी आहे. भाजपचा वैचारिक पाया इतका मजबूत आहे की, २०-३० वर्षे दुसऱ्या पक्षात राहून नेते-कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत, असे नड्डा म्हणाल़े आहेत .

Share This News
error: Content is protected !!