राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, संजोग वाघेरे यांना डच्चू

732 0

पिंपरी- पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीने विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना हटवून त्यांच्या जागी अजित गव्हाणे यांची निवड केली आहे.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्चशिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण असल्याचं सांगितले जात आहे.