Supriya Sule

Supriya Sule : राष्ट्रवादीमध्ये फूट नाही म्हणत सुप्रिया सुळे यांनी ‘त्या’ चर्चांना दिला पूर्ण विराम

895 0

पुणे : अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावर शरद पवार यांनी आज सकाळी परखड वक्तव्य केले. यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरउच्चार केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
राष्ट्रवादीत फूट पडली की नाही, अजित पवार यांची वेगळी भूमिका मान्य आहे, का असे सवाल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी पुन्हा एकदा सांगते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील हे अध्यक्ष आहे. मी आधी जे बोलले त्यावर मी ठाम आहे. पक्षातील 9 आमदार आणि दोन खासदारांनी वेगळी भूमिका घेतली आहे इतकेच. त्यांना नोटीस पाठवलेली आहे.

आघाडीबाबतही केली भूमिका स्पष्ट
सुळे, म्हणाल्या, माझे आणि संजय राऊत यांचे बोलणं झालं आहे. आम्ही संभ्रम निर्माण करतोय असं मला ते म्हणाले नाहीत. पक्षांमध्ये वेगळी भूमिका घेणाऱ्याना निलंबित करण्याबाबत पत्र आम्ही विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहे. मी दादांबरोवर गुप्त बैठका केलेल्या नाहीत. भावाला भेटायला गुप्तता बाळगण्याचे कारणच काय. आम्ही पारदर्शी पणे काम करतो. अजित पवारांना परत घेणार का? याविषयी बोलण्या इतपत मी मोठी नाही. शरद पवार साहेब सकाळी बोलले, तो त्यांचाच अधिकार आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत आमचे बॉस आहेत आणि बॉस इज ऑलवेज राईट.

Share This News
error: Content is protected !!