Eknath Khadse

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात जामीन मंजुर

679 0

मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना या प्रकरणी नियमित जामीन मंजुर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

यापुर्वी खडसे (Eknath Khadse) यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजुर केला होता. आजच्या सुनावणीत त्यांना मोठा दिलासा मिळाला असून न्यायालयाने नियमित जामीन मंजुर केला आहे. एकनाथ खडसेंचे वकिल मोहन टेकावडे यांनी याची माहिती दिली आहे.

काय आहे भोसरी भूखंड घोटाळा?
भोसरीतील एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप असा होता की, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली होती. 3.75 कोटी रूपयांना ही जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात रीतसर करण्यात आली. मात्र या जमीनीचा मूळ बाजारभाव 31 कोटी रूपये असताना गिरीश यांनी तो फक्त तीन कोटी रूपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा असल्याने तो इतका कमी किमतीत कसा काय विकत घेतला. यांसह अनेक मुद्यावरून ईडीने तपास सुरू केला.

Share This News
error: Content is protected !!