Nashik News

Nashik News : रोहित पवारांसह सगळेजण मंत्रीमंडळात जायला तयार होते; मंत्री छगन भुजबळांचा दावा

881 0

नाशिक : ‘अजित पवार गटातला एकही माणूस असा नाही, जो ब्लॅकमेल करेल. काहीही आपलं बोलायचं, उलट रोहित पवार आणि सगळ्यांनी मंत्रीमंडळात जायचं, असा निर्णय घेत या पत्रावर सह्या केल्या असल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात आला आहे. विरोधी पक्षात असल्यावर हे बोलायला पाहिजे, नाहीतर विरोधी पक्षाचे आमदार म्हणून कसं सिद्ध होईल? यासाठी हा खटाटोप असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील वाद संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अजित पवार यांच्यासह इतर आमदार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. यामुळे आता शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. यानंतर मागच्या काही काळात या दोन्ही गटातील वाद टोकाला पोहोचले आहेत.

यादरम्यान आता भुजबळ यांनी रोहित पवार यांचा समाचार घेत मंत्रिमंडळात जाण्यासाठी रोहित पवार यांच्यासह सगळ्यांच्या सह्या पत्रावर करण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट केला आहे.

Share This News
error: Content is protected !!