सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मविआ आणि महायुतीमधील जागावाटप देखील अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र अजूनदेखील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीचा उमेदवार कोण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. मात्र भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रचाराची तयारी केली असून दौरेही सुरू केले आहेत. या दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी कुडाळमध्ये एका मेळाव्यात बोलताना आपल्या भाजप प्रवेशाचा किस्सा सांगितला.
काय म्हणाले नारायण राणे?
फडणवीस आणि मी, बावनकुळे यांच्या मुलाच्या लग्नावरून विमानाने येत होतो. त्यावेळी विमानातून उतरल्यावर देवेंद्र फडणवीस चालत चालत माझ्याकडे आले आणि दादा जरा बाजूला या म्हणाले. मला बाजूला बोलवून घेतलं आणि म्हणाले दादा आता बस झालं. आमच्या भाजपमध्ये या. फडणवीस यांनी भाजपमध्ये येण्याबाबत सांगताच मी त्यांना म्हटलं, अरे मी एका पक्षाचा नेता आहे आणि तु आम्हाला रस्त्यात अशा पद्धतीने विचारतोस? तु मला भेट आणि आपण भेटल्यावर याच्यावर बोलू. तू मला बोलव आपण बोलून यावर चर्चा करू असं सांगितलं. मी प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक निर्णय घेतो आणि पद मिळवायचा असेल तर त्या पदासाठी लायकीचा बनतो असं नारायण राणे म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल
Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव
Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड
Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या