Nana Patole viral video case : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रार”…

290 0

Nana Patole viral video case :  काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ होता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा… या व्हिडिओमध्ये नाना पटोले हे एका महिलेसोबत दिसून येत आहेत. परंतु व्हिडिओतील फोटोमध्ये दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. केवळ नाना पटोले यांचा शर्ट मात्र सारखाच दिसत आहे . अर्थात या व्हिडिओ मागील सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

हा व्हिडिओ शेअर करून चित्रा वाघ यांनी “काय नाना… तुम्ही पण झाडी ,डोंगर आणि हटीलात…!” असे कॅप्शन देखील दिले होते. यावरून नाना पटोलेंसह चित्रा वाघ देखील मोठ्या प्रमाणावर युजर्स कडून ट्रोल झाल्या होत्या.

दरम्यान या व्हिडिओ प्रकरणावरून आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जन सुनावणीच्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की ,” संबंधित पीडिता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो. राज्य महिला आयोगाकडे याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर त्याची शहानिशा करून संबंधित पोलिसांना कारवाई करा ,म्हणून सूचना देतो .राज्य महिला आयोग हा घटनात्मक दर्जाचा विभाग आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार त्यासंबंधीत पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला सूचना देत असतो असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!