Mumbai Lok Sabha : मुंबईत नरेंद्र मोदी आणि शरद पवार आमने सामने; आज पार पडणार दोघांच्याही प्रचार सभा

814 0

मुंबई : राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान पार पडले असून आता पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. पाचव्या टप्प्यात राज्यात १३ जागांवर मतदान होणार आहे. आता या १३ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. राज्यातील शेवटच्या टप्प्यात प्रचार उद्या संपत असल्यामुळे आज मुंबईत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी आणि महायुतीची सभा होणार आहेत. आज शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा पार पडणार असून महायुतीच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी स्वत: रिंगणात उतरले आहेत.

ठाकरे गटाकडून आजच्या सभेसाठी मुंबई महापालिकेकडे शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली मात्र मनसेकडून आज होणाऱ्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, म्हणून अर्ज केला असल्यामुळे हे मैदान मनसेला सभेसाठी देण्यात आले आहे. त्यामुळे, इंडिया आघाडीला आजच्या सभेसाठी बीकेसी मैदान निवडावे लागले आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या सभेला बीकेसी मैदानावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections : राज्यात ड्राय डेची घोषणा; ‘ या’ दिवशी बंद असणार मद्यविक्री

Pune News : पुणे हादरलं! कोथरूड परिसरात कोयत्याने तरुणाची निर्घुण हत्या; काय आहे नेमकं प्रकरण

Share This News
error: Content is protected !!