पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कोयत्याची दहशत पहायला मिळाली. पुण्यातील कोथरूड परिसरात गुरुवारी मध्यरात्री भयंकर घटना घडली असून अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कर्वे रोड परिसरात एका तरुणाचा अतिशय निर्घृणपणे कोयत्याने खून करण्यात आली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले असून श्रीनिवास शंकर वत्सलावर (वय २२, राहणार लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास हा मित्रासोबत मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास कर्वे रस्त्यावरील गांधी चौक परिसरातून जात होता त्याचवेळी पाच ते सहा जणांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली. त्यावेळी श्रीनिवास सोबत असणाऱ्या व्यक्तीने पळ काढला. मात्र श्रीनिवास हल्लेखोरांच्या ताब्यात सापडल्यानंतर हल्लेखोरांनी अतिशय निर्घृणपणे कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. व घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, श्रीनिवासला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चार ते पाच मारेकरी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती व प्राथमिक माहितीतून हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.