Supriya-Sule

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

363 0

पुणे : बारामती लोकसभा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या ठिकाणी नंणद (Supriya Sule) विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलीय तर महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज सुप्रिया आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांनी संपत्तीबाबत आपली माहिती दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा निवडून येण्याचा निर्धार व्यक्त केला. सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा पार्थ पवार यांचे ५५ लाखांचे कर्ज आहे. तर सुप्रिया सुळे यांचे यंदा शेतीचे उत्पन्न शून्य रुपये असल्याचंही शपथपत्रातील माहितीमधून समोर आलंय.

सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशीर्वाद, शुभेच्छा, अतूट विश्वास आणि भरघोस पाठबळ यांच्या जोरावर मला पुन्हा या मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे. मायबाप जनतेची सेवा, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचा सन्मान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राखण्यासाठी मी लढत आहे. या लढतीत मायबाप जनता माझ्या सोबत राहिल याची मला खात्री आहे असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!