Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

146 0

पुणे : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यापूर्वी ते पुण्यातील दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. आपला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले रवींद्र धंगेकर?
रवींद्र धंगेकर म्हणाले की, आज सगळ्यात मोठा दिवस आहे. मी लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्यांला कॉंग्रेसने मोठी संधी दिली आहे. त्यामुळे येणारा काळ रवींद्र धंगेकरचा असेल. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. पुणेकरांसाठी मत मागत आहे आणि पुणेकरच जिंकणार आहेत.तसेच ‘मागील 30 वर्षांपासून पुण्याचं राजकारण जवळून पाहिलं आहे. नगरसेवकापासून तर लोकसभेच्या निवडणुकीप्रर्यंत कशाप्रकारे विरोधक यंत्रणेचा वापर करतात हे पाहिलं आहे. त्यामुळे वेळ आली की खुल्या मनाने कोणाला किती मतं पडणार हे सांगेन. विरोधकांचे सगळे प्रयोग माझ्या डोळ्यासमोर झाले आहे. त्याचे हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे’, असा हल्लाबोल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

कसा आहे महाविकास आघाडीचा कार्यक्रम?
सकाळी 10:30 वाजता : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणे स्टेशन येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार
सकाळी 11 वाजता : विभागीय आयुक्त कार्यालय येथे सुप्रियासुळे यांचा अर्ज दाखल करण्यात येणार
सकाळी 11:30 वाजता : डॉ. अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर यांचा अर्ज दाखल करण्यात येणार.
सकाळी 11:45 वाजता : हॉटेल शांताई समोर, रास्ता पेठ येथे महाविकास आघाडी तथा इंडिया फ्रंटची भव्य सभा होणार

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Related Post

Ajit Pawar

Ajit Pawar : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांनी माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम केला रद्द

Posted by - October 28, 2023 0
बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार…

कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असे आहेत वाहतुकीतील बदल

Posted by - May 3, 2022 0
पुणे- कर्वे रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दुमजली उडडाणपुलामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र येथील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे…

पुणे पोलीस हायटेक होणार ! सायबर तपासासाठी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग; पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची माहिती

Posted by - December 21, 2022 0
पुणे : राज्यात आणि देशभरात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवून लाखो करोडोंचा…

पहिल्या भारतरत्न लता मंगेशकर पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Posted by - April 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दौऱ्यावर येत असेल भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी मुंबईत आले आहेत या सोहळ्यासाठी…
Rohit Pawar

Maharashtra Politics : दिल्ली पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही; रोहित पवारांची टीका

Posted by - July 13, 2023 0
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-भाजपसोबत राज्यात सत्तेत सहभागी झाले आणि महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *