MNS

MNS : अखेर ठरलं ! मनसे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; राज्यात ‘एवढ्या’ जागा लढवणार

501 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसेनं (MNS) लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 21 लोकसभेच्या जागांवर मनसे आपला उमेदवार उभा करणार आहे. मुंबईतील सहाही जागा मनसे लढवणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मनसे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती, अखेर मनसे राज्यातील एकूण 21 लोकसभेच्या जागा लढवणार असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील सहाही जागा मनसे लढवणार असल्यानं मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठी चूरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!