Nitin Bhosale

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का ! माजी आमदार नितीन भोसलेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

631 0

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Nashik News) सर्वच पक्षांतील नाराजी नाट्य आता समोर येऊ लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आता मनसे पक्षातदेखील नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनसेच्या माजी आमदाराने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार नितीन भोसले मनसे सोडून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे मनसेला मोठा हादरा बसला आहे.

मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मोजके नेते आणि नितीन भोसलेंचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक शहरातील मनसेच्या राजगड कार्यालयापासून दूर होते. ते मनसेच्या कोणत्याही कामकाजातही पुढाकार घेत नव्हते. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नितीन यांनी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले नितीन भोसले?
पक्ष कामकाजात सुधारणा होत नाही हे बघून मी भविष्यातील परिस्थितीचा वेध घेऊन शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे नितीन यांनी सांगितले. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर नाशिकमधील मोठा गट अजित पवारांसोबत गेला.अशावेळी शरद पवार गटाला तिथे एका मुख्य नेत्याची गरज होती. हे पाहता नितीन भोसले राष्ट्रवादी शरद पवार गटात महत्वाची भूमिका बजावू शकतील असे म्हटले जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!