Raj Thackeray

Raj Thackeray : भाजपची ऑफर ते पवारांच्या भेटीगाठी; राज ठाकरेंनी सांगितलं लोकसभेचं प्लॅनिंग

1061 0

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आजची बैठक आम्ही लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी असेल, असं राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात जो राजकीय घोळ झालेला आहे त्यामुळं महानगरपालिका निवडणुका लागतील असं वाटत नाही. सध्या स्थितीत निवडणुका लावून राजकीय पक्ष पायावर धोंडा पाडून घेणार नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी यादरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरदेखील भाष्य केले.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले एक टीम अगोदर पाठवली होती. दुसरी टीम लवकरचं जाईल. 2014 पासून हे सर्वजण मिळालेले आहेत. पहाटेचा शपथविधी तुम्हाला आठवत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी चोरडिया यांच्या ठिकाणी जागा मिळाली, असा टोला राज ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपकडून राज ठाकरेंना ऑफर
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपची ऑफर असून निर्णय घेतला नसल्याचं म्हणाले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत असल्यानं निर्णय घेतला नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. मात्र, राज ठाकरे कधीपर्यंत निर्णय घेतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!