मंत्रीपदासाठी शिवलेला कोट कामाला येणार; भरत गोगावले यांची ‘या’ पदावर वर्णी लागण्याची शक्यता

179 0

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात तयारी करत असताना नाराज नेत्यांचा पुनर्वसन करण्याचा मोठा आव्हानही सर्व पक्षांसमोर उभे ठाकलंय.

अशातच शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी महामंडळांवर या नेत्यांची वर्णी लागत असल्याचा पाहायला मिळत आहे. नुकतीच आमदार संजय शिरसाठ यांचे सिडकोच्या अध्यक्षपदी तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती व जमाती महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तर लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली विधानसभेतून पत्ता कट झालेले शिवसेनेचे माजी खासदार हेमंत पाटील यांचे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

तर आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतोद राहिलेले महाड रायगड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळेल असं बोलला जात होतं आमदार गोगावले यांनीही अनेकदा मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली होती मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने आता काही दिवसांवर विधानसभा निवडणूक आल्यानंतर आमदार भरत गोगावलेंची महामंडळावर वर्णी लागेल असं बोललं जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!