Breaking News
Gulabrao Patil

Gulabrao Patil : आईनंतर आता भावाचेही निधन; मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर

982 0

जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असताना आता त्यांच्या भावाचेही निधन झाले आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गुलाबराव पाटील यांचे छोटे भाऊ कैलास रघुनाथ पाटील यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 12 वाजता मूळ गाव धरणगाव तालुक्यातील पाळधी या ठिकाणाहून निघणार आहे.

मंत्री गुलाबराव पाटील हे आज कॅबिनेटची बैठक असल्यामुळे मुंबईला होते. मात्र भावाच्या निधनाची बातमी कळल्यानंतर ते तातडीने जळगावकडे रवाना झाले आहेत. सुनील पाटील हे मोठे भाऊ तर गुलाबराव पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत. तर कैलास पाटील हे सर्वात लहान भाऊ होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्री रेवाबाई पाटील यांचे दोन महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये निधन झालं. रेवाबाई पाटील यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर दोनच महिन्यांनी धाकट्या भावाचे निधन झाल्याने गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News
error: Content is protected !!