मुंबई : काँग्रेसला राज्यात मोठा धक्का बसला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी ट्विट करत आपल्या राजीनाम्याबद्दल माहिती दिली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मिलिंद देवरा यांनी काय लिहिले ट्विटमध्ये?
’ मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. यासोबतच माझे माझ्या कुटुंबाचे गेल्या 55 वर्षांपासून काँग्रेससोबत नाते होते. या नात्याला देखील पूर्णविराम मिळाला आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला’ असं ट्विट देवरा यांनी केलं आहे.
मिलिंद देवरा यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते आणि काही माजी नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला. आता त्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये 1- सुनील नरसाळे , 2- हंसा मारू, 3- रमवाचान मुराई, 4- प्रमोद मांजरेकर, 5- अनिता यादव, 6- गजेंद्र लष्करी यांचा समावेश आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे
Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा
Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!
Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग