मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नक्कीच नियुक्ती करण्यात आले असून ‘मेट्रो वुमन’ अशी ओळख असणाऱ्या अश्विनी भिडे या आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव असणार आहेत अश्विनी भिडे यांचा नेमका प्रवास कसा आहे पाहूयात ‘TOP NEWS मराठी’च्या ‘स्पेशल रिपोर्ट’मधून…
अश्विनी भिडे 1995 च्या महाराष्ट्र कॅडरच्या IAS अधिकारी असून. त्यांनी सांगलीतून ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुढे पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. 1997 ते 1999 या काळात त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली करण्यात आली. नागपूरमध्येही त्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलंय. 27 वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्रधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण-क्रिडा विभागाच्या सचिव म्हणूनही काम केलं आहे. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची मुंबई मेट्रो-3ची धुरा अश्विनी भिडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. मेट्रो 3 चे आरे कॉलनीत कारशेड उभारण्यात अश्विनी भिडे यांचा मोठा वाटा आहे पेट्रोलमध्ये केलेल्या अनेक सोयीसुविधानामुळे मेट्रो वुमन अशी त्यांची ओळख आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार असताना अश्विनी भिडे यांची मेट्रोतून बदली झाली आणि त्या पूर्व उपनगराच्या अतिरिक्त आयुक्त झाल्या त्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाच्या प्रमुख अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अश्विनी भिडे यांची पुन्हा मुंबई मेट्रोमध्ये बदली झाली आणि आता त्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणूनही कार्यरत असणार आहेत या सोबतच मुंबई मेट्रोचा पदभारही त्यांच्याकडे कायम आहे
EDITORIAL: संपादकीय! काका-पुतण्या एक झाले तर कुणाचे काय गेले?